‘ तू नाहीस ‘ हे सत्य, ‘ तू आहेस ‘ ही जाणीव,
असं माझं होतंय काही
धावावं लागेल शेवट पर्यंत कारण
पळून जाता येत नाही.
तुझे अश्रू पुसता नकळत
मीच तुझा गं अश्रू झालो
मग मनात काय, डोळ्यांत सुद्धा
अश्रूला स्थान मिळत नाही
धावावं लागेल शेवट पर्यंत कारण
पळून जाता येत नाही.
तुझ्या माघारी तुझ्याविषयी
तुझ्याशीच मी बोललो जेव्हा
मूर्ततेचा अमूर्ततेशी संबंध
मला आढळत नाही
धावावं लागेल शेवट पर्यंत कारण
पळून जाता येत नाही.
– सचिन