आज आली एक पावसाची सर…. अगदी तिच्यासारखी…अचानक. आणि क्षणार्धात अशी काही कोसळली माझ्यावर, की मी माझा राहीलोच नाही. पुरता भिजलो, चिंब न्हालो तिच्यात. मनात आनंदाचा एवढा कल्लोळ की ओठ निःशब्द आणि मी स्तब्ध. ती कोसळत राहिली तिच्या ओघाने. आणि काही क्षणातच मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडला. भानावर आलो तेव्हा कळलं ,ती पावसाची सर कधीच निघून गेली होती. मात्र मगाशी स्वतःचं अस्तित्व विसरलेल्या मला त्या सरीचं अस्तित्व आताही स्पष्ट जाणवत होतं. मला भिजवून,माझ्यात झिरपून, माझ्या मनात ती कायमची स्थिरावली होती…. अगदी तिच्यासारखीच. मी तुलना करतोय पण एक खरं खरं सांगू? तिची सर, या पावसाच्या सरीला काही येत नाही.
– सचिन