कला,कलाकार आणि त्याची उद्दिष्टे व ध्येय—
निसर्गातील विविध भाव भावनांचा अंतर्भाव असलेला सृजनशील अविष्कार म्हणजे कला होय. म्हणजेच या भावना व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे कला. आणि असा अविष्कार जो निर्माण करतो,तो ‘कलाकार’. असं म्हणतात की कलाकार हा जन्माला यावा लागतो. जन्माला आल्यानंतर त्याला कलेचं शास्त्र शिकावं लागतं, त्याचं तंत्र अवगत आणि विकसित करावं लागतं, विद्या मिळवावी लागते आणि आपली ही कला …