भावना… या मला पाण्यासारख्या वाटतात. कधी बरसतात , कधी वाहतात तर कधी साचतात. अशा या त्यांच्या विविध अवस्था. बरसताना सुद्धा कधी हळुवार रिमझिम तर कधी कठोर मुसळधार. कधी अल्लड खळखळत वाहणं तर कधी धबधब्यागत बेधुंद कोसळनं. अनेक वाहिन्यांनी मनाच्या सागरात सामील होतात या भावना….आणि साचून राहतात. फुलावरील दवासारखी तरल ते उसळलेल्या लाटेसमान उग्र. भावनेचं बरसणं,वाहणं,साचणं …वर वर साचणं तरी सुद्धा आतून वाहत राहणं…हे प्रवाहीपण तिचं जिवंतपणाचं लक्षण असतं. आणि जेव्हा हे प्रवाहीपण संपतं तेव्हा भावनेचा अंत होतो.
